उद्धव ठाकरे यांचा झंझावाती उत्तर महाराष्ट्र दौरा, १२ जुलै रोजी शेतकऱ्यांशी साधणार संवाद

11

सामना प्रतिनिधी, मुंबई

शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेने केलेल्या आंदोलनानंतर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना खरोखरच मिळतोय का, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळतो किंवा नाही यासह विविध प्रश्नांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. १२ जुलै रोजी उद्धव ठाकरे जळगाव व धुळे जिल्ह्याचा दौरा करणार असून तेथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या जळगाव व धुळे दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे –

सकाळी ११.३० वाजता जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर उद्धव ठाकरे ११.४५ वाजता पाळधी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी १२.०० वाजता धरणगाव येथे सभा घेणार आहेत. त्याचप्रमाणे दुपारी १.३० वाजता एरंडोल विधानसभा मतदारसंघातील पारोळा येथे सभा होणार असून दुपारी ३.०० वाजता धुळे येथे सभा होईल.

आपली प्रतिक्रिया द्या