शिरूर, मावळमध्ये आज उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यातील निवडणुकीचा चौथा आणि शेवटचा टप्पा सोमवार, 29 एप्रिल रोजी होत असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबई, शिरूर, मावळ, पालघर येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. आज 25 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता शिरूर येथे तर रात्री 8 वाजता मावळ येथे सभा होणार आहे. शिरूर येथील चाकणमधील मार्केट यार्डमध्ये तर मावळमध्ये सांगवीतील पीडब्ल्यूडी ग्राऊंड येथे सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यांत उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रभरातील प्रचारसभांना लाखोलाखोंच्या गर्दीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.