अरुण गवळीच्या  याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मागवले राज्य सरकारचे उत्तर

893

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात गँगस्टर अरुण गवळीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्र सरकारचे उत्तर मागवले.

गवळीला गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. या शिक्षेविरोधात गवळीने अपील दाखल केले आहे. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती आर. बानुमती आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र सरकारला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. अरुण गवळीच्या दोघा साथीदारांनी 2 मार्च 2007 रोजी कमलाकर जामसंडेकर यांची गोळय़ा झाडून हत्या केल्याचा आरोप आहे.

आपली प्रतिक्रिया द्या