शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत द्या! – एकनाथ शिंदे 

1288

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेतजमिनीला 8 हजार रुपये प्रतिहेक्टरी तर बागायतीला 18 हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत जाहीर केली; मात्र ही रक्कम अत्यंत तुटपुंजी असून शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात यावी या मागणीचा पुनरुच्चार शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी केला.

अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी मच्छीमारांना प्रत्येकी 25 हजार रुपये मदत देण्यात यावी. त्याचप्रमाणे मच्छीमार बोटींना डिझेलसाठी प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी मदत, खरीपासाठी 8 हजार; बागायतीला हेक्टरी 18 हजार

राज्यपालांकडून जाहीर करण्यात आलेल्या मदतीचा हिशेब करता शेतकऱयांना गुंठय़ाला केवळ 80 रुपये मदत मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱयांना एकरी 25 हजार रुपयांची सरसकट मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी केली आहे.

भेट पुढे ढकलली

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांचे एक शिष्टमंडळ आज दुपारी 4.30 वाजता राज्यपालांची भेट घेणार होते, मात्र तिन्ही पक्षांचे नेते ओला दुष्काळाच्या पाहणी दौऱयावर असल्याने ही भेट पुढे ढकलण्यात आली, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या