शिवसेनेची विजयादशमी! दसरा मेळावा शिवतीर्थावरच; उच्च न्यायालयाने शिंदे गट आणि पालिकेची याचिका फेटाळली

शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवतीर्थी (शिवाजी पार्क) ही परंपरा आहे. मात्र यंदा शिंदे गटामुळे हा वाद न्यायालयात पोहोचला. या वादावर उच्च न्यायालयात सुरू झालेली सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली.

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचा हस्तक्षेप अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेच्यावतीने ज्येष्ठ वकील अस्पी चिनॉय यांनी तर शिंदे गटातर्फे ज्येष्ठ वकील जनक द्वारकादास बाजू मांडली. मात्र युक्तीवादात शिवसेनेचा युक्तीवाद उच्च न्यायालयाने ग्राह्य धरत शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परवानगी दिली आहे.