पीक कर्जमाफीच्या याद्या बँकांवर लावण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन

233

सामना प्रतिनिधी । अंबड

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्याप्रमाणे कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करून त्या बँकांच्या नोटीस बोर्डावर व गावात ग्रामपंचायतवर लावण्यात याव्यात. तसेच पीक कर्ज वाटपात बँकेकडून होत असलेली दिरंगाई पाहता आज गुरुवारी माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखांना धडक भेटी देऊन आंदोलन करून आढावा घेण्यात आला.

माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वाखाली बँकांनी शेतकरी कर्जमाफीची यादी बँकेत तसेच गावातील ग्रामपंचायतमध्ये लावण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. तसेच येत्या आठ दिवसांत पीक कर्ज वाटप करावे अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार संतोष सांबरे यांनी दिला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अशोक बर्डे, तालुका संघटक दिनेश काकडे, उद्धव उगले, शिवसंग्रामचे नारायणराव टकले, उपतालुकाप्रमुख सिद्धेश्वर उबाळे, अल्पसंख्याक आघाडी शहर अध्यक्ष सगीर शेख, विभागप्रमुख कल्याण टकले, परमेश्वर वाघुडे, शैलेश दिवटे, श्याम मुले, सदाशिव गायकवाड, रणजित कचरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकरी उपस्थित होते.

santosh-sambre-mla

आपली प्रतिक्रिया द्या