राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात

supreme-court-of-india

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करून देखील पुरेसा वेळ वाढवून दिला नाही. याविरोधात शिवसेनेने आता सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी दावा दाखल केला आहे. शिवसेना नेते अनिल परब यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना ही माहिती दिली आहे.

भाजपने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपालांनी नियमांप्रमाणे शिवसेनेला आमंत्रण दिलं होतं. मात्र त्यावेळी भाजप प्रमाणे शिवसेनेला 48 तास न देता अवघे 24 तास देण्यात आले. या 24 तासांत शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र पाठिंब्याचे पत्र नसल्याने राज्यपालांनी हा राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी बोलावले. शिवसेनेला भाजप प्रमाणेच 48 तासांची मूदत का देण्यात आली नाही? सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर देखील मूदतवाढ का करून दिली नाही? असे सवाल त्यांनी नैसर्गिक न्यायप्रमाणे आम्हाला तीन दिवस मूदत वाढ द्यायला हवी होती, अशी मागणी केली. सर्वांना समान आणि पुरेसा वेळ दिला गेला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

शिवसेनेन आज दावा दाखल केला आहे. आम्ही सत्तास्थापनेचा दावा केला. आमचे 56 + 8 सहयोगी अशी यादी दाखल केली. आम्हाला जे पक्ष सपोर्ट करणार आहेत त्यांची पत्र मिळण्यासाठी आमच्या सर्वांच कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरणं गरजेचं आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील आमदारांना सोबत आणण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यासाठी वेळ वाढवून द्या अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आम्हाला वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या