संस्कृतीला गालबोट लागणार नाही याकडे लक्ष द्या! शिवसेनेचे मंडळांना आवाहन

57
ganesh-festival-meeting

सामना प्रतिनिधी । मुंबई

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. हा उत्सव शांततेत पार पाडावा. सर्वांनी पोलिसांना सहकार्य करून कोणत्याही परिस्थितीत आपल्या संस्कृतीला गालबोट लागणार नाही याकडे लक्ष द्या, असे आवाहन विक्रोळीतील गणेशोत्सव मंडळांना शिवसेनेच्या वतीने करण्यात आले.

गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी विक्रोळी येथे चर्चासत्राचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी मतदारसंघातील सुमारे 114 मंडळांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. यावेळी गणेशोत्सव समन्वय समितीचे आणि शिवसेना नेते लीलाधर डाके यांनी सणाचे पावित्र्य राखा असे आवाहन केले. आमदार सुनील राऊत यांनी गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश उत्सव सण शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन केले. यावेळी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक टपले, सहआयुक्त शेख, तावडे, पोलीस निरीक्षक सावंत, वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक पायगुडे, पोलीस निरीक्षक ढाकणे, अग्निशमन दलाचे अधिकारी माईणकर, ईशान्य मुंबई विभागप्रमुख नगरसेवक रमेश कोरगावकर, विधी समिती अध्यक्षा सुवर्णा करंजे आदी उपस्थित होते.

वरळीत सामाजिक एकोपा जपणारा सुवर्णमहोत्सवी गणेशोत्सव

वरळीत सामाजिक एकोपा जपणारा गणेशोत्सव यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. वरळीच्या केशव आळीतील पीडब्ल्यूडी वसाहतीमध्ये हा गणेशोत्सव साजरा होतो. रविवारी या गणपतीचे थाटामाटात आगमन झाले. त्याप्रसंगी ‘सुफी सहारा’ संस्थेच्या सदस्यांसह युनूस कादरी, अन्वर शेख, माहीम दर्गा कमिटीचे हनीफ कुरेशी, वरळी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विशाल शिंदे यांच्या सूचनेनुसार मूर्तिकार किरण थोरात यांनी या गणेशाची मूर्ती घडवली आहे. वसईच्या जेन्स दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष जेन्स फर्नांडिस हे दरवर्षी या गणपतीची सजावट करतात अशी माहिती उत्सवाचे आयोजक नगरसेवक अरविंद भोसले यांनी दिली.

‘करीरोडचा राजा’चे आगमन

करीरोड पश्चिम विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘करीरोडचा राजा’चे रविवारी ना. म. जोशी मार्गावरील शिवशक्ती पार्क येथील मूर्तीशाळेतून पारंपरिक पद्धतीने वाजतगाजत आगमन झाले.

आपली प्रतिक्रिया द्या