नाशिकमध्ये करवाढ, बीओटीविरोधात शिवसेना आक्रमक

34

सामना ऑनलाईन । नाशिक

शिवसेनेने आज महापालिकेच्या महासभेत पत्राद्वारे घरपट्टी, पाणीपट्टी दरवाढ, बीओटी तत्वावर भूखंड विकसित करण्याच्या सत्ताधारी भाजपाच्या निर्णयाला विरोध केला, या पत्राच्या वाचनाची शिवसेनेने महासभेत मागणी केली, मात्र महापौरांनी पत्राचे वाचन टाळून महासभा सुरूच ठेवल्याने संतप्त शिवसेना नगरसेवकांनी राजदंड पळविला, करवाढीविरोधात घोषणाबाजी करीत सभागृह दणाणून सोडले.

महापौरांनी घाईगर्दीत विनाचर्चा विषय मंजूर करून ही महासभा गुंडाळली. स्थायी समितीत बुधवारी शिवसेना, काँग्रेसने विरोध करूनही सत्ताधारी भाजपाने घरपट्टीत १८ टक्के, तर पंचवार्षिक पाणीपट्टीत तब्बल १२० टक्के वाढीला मंजुरी दिली. नाशिक महापालिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी करवाढ असून, नाशिककरांवर हा अन्याय असल्याने शिवसेना आक्रमक झाली.

आपली प्रतिक्रिया द्या