महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रविवारी बेलापूर येथे महायुती सरकारला जोडो मारो आंदोलन करत निषेध नोंदवला.
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाध्यक्ष लखन भगत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनाच्या वेळी शिवरायांच्या पुतळ्याला प्रथमतः दुग्धाभिषेक करण्यात आला. भ्रष्टाचारी महायुती सरकार जोपर्यंत पुतळा बनवणाऱ्याला अटक करत नाही, तोपर्यंत आंदोलन तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. महायुती सरकारचे आता केवळ काही दिवसच उरले आहेत. या सरकारने केलेल्या भ्रष्टाचारामुळे संपूर्ण राज्यभर या सरकारची प्रतिमा मलीन झाली आहे. आराध्य दैवतांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करून या सरकारने आपली उज्वल कामगिरी सिद्ध केली आहे. या महायुती सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड असंतोष धगधगत आहे. महाराष्ट्रातील जनतेने या सरकारची आता पूर्ण चव ओळखली असल्याचे संजय छल्लारे म्हणाले.
भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा जोरदार घोषणा करत आंदोलकांनी हा परिसर दणाणून टाकला होता. आंदोलनात तालुकाप्रमुख लखन भगत,माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, रोहित वाकचौरे,अशोक थोरे मामा, भगवान उपाध्ये,सुधीर वायखिंडे, राजेंद्र बोरसे, संजय साळवे, सिद्धांत छल्लारे, सुरेश थोरे, तेजस बोरावके, दत्तात्रय करडे, बापू बुधेकर, रोहित नाईक, मुस्ताक शेख, किशोर मकाने, उत्तम कल्याणकर, अकील पठाण, विशाल दुपटी, विशाल पापडीवाल,राजू डुकरे, विजुभाऊ बडाख, प्रसाद पुजारी, अमर हिवाळे, कृष्णा साठे,विशाल रनवरे, गौरव अवसर, सनी रणदिवे, सागर शिरसाठ, सचिन आहेर, अनिकेत ब्राह्मणे, मोहित साळवे, गोविंद रणवरे, आकाश रणवरे, प्रकाश रणवरे, भैय्या लोंढे, अमोल शेळके, विकास ठोंबरे, कैलास आवटी, मुस्ताक शेख, उमेश भांड, सतीश कारले, सुरेश जाधव, चंद्रकांत नाईक, रफिक शेख, प्रकाश कुमावत, कैलास पुजारी, नितीन शिंदे, योगेश ढसाळ, प्रकाश परदेशी, योगेश कोरडीवाल,संजय परदेशी,बापूसाहेब बोर्डे,करण फुलपगार वैभव तेलोरे हर्ष वासाळे अविनाश राजपूत ऋषिकेश निकम, अविनाश फुल पगार, मनोज निकम अमोल रजपूत लक्षदीप पवार मयूर जाधव,हर्षल बोर्ड यांच्यासह हजारो शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.