नातं कसं टिकवावं हे जेटलींकडून शिकलो – संजय राऊत

2502
sanjay-raut-parliament-new

‘जेव्हा मी पहिल्यांदा सदनात आलो तेव्हा अरुण जेटली हे विरोधी बाकांवर बसायचे आणि आम्ही त्यांच्यासोबत होतो. संघर्षाचं दुसरं नाव अरुण जेटली होतं आणि त्यांच्या प्रत्येक संघर्षात मी त्यांची साथ दिली. ते जो आदेश देतील तेव्हा त्याचं पालन देखील आम्ही करायचो’, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत राज्यसभेत बोलताना म्हणाले. राज्यसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी संजय राऊत बोलत होते.

‘नातं काय असतं. ते कसं टिकवायचं हे जर शिकायचं असेल तर ते आम्ही जेटलीजींकडून शिकलो. ते वकील होते. पण ते असे वकील जे राजकारणात आणि व्यक्तीगत जीवनात कधी खोटं बोलले नाहीत’, असंही राऊत म्हणाले.

‘देशाचे आणि सदनाचे नुकसान झाले आहेच, पण त्यांच्या जाण्यानं शिवसेनेचं देखील नुकसान झालं आहे. शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. त्यांचा संघर्ष आम्ही जो पाहिला आहे तो आम्हाला नक्की आठवणीत राहील’, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

आपली प्रतिक्रिया द्या