शेतकर्‍यांचे प्रश्न मांडताना विधानसभेत माईक बंद केला जातो! शिवसेना आमदार कैलास पाटील यांचा गंभीर आरोप

शेतकर्‍यांच्या प्रश्नांवरील अभ्यासपूर्ण चर्चा विधानसभेने पाहिल्या आहेत. पूर्वी शेती, शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर तळमळीने प्रश्न मांडले जायचे. आताही आम्ही शेतकर्‍यांचे प्रश्न मांडतो. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर बोलायला लागले की लगेच घंटा वाजायला सुरुवात होते. कधी कधी तर माईकही बंद केला जातो, असा गंभीर आरोप शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी केला आहे.

धाराशिवमध्ये एका कार्यक्रमात बोलताना आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत होणार्‍या पक्षपातावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पूर्वी शेती, शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक भूमिका घेत. शेतकर्‍यांच्या हितासाठी सत्ताधारी बाकांवरूनही विरोधकांच्या भूमिकेला पाठबळ मिळत असे. अशा अभ्यासपूर्ण चर्चा आता दुर्मिळ झाल्या आहेत. राजकीय भाषणासाठी तास तास वेळ दिला जातो. परंतु शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर बोलायला उभे राहिले की, एकतर माईक तरी बंद होतो किंवा दर सेकंदाला घंटा वाजते, असे आमदार पाटील म्हणाले.

विधानसभेत शेतकर्‍यांच्या प्रश्नांना, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना फार महत्त्व दिले जात नाही. त्याउलट राजकीय भाषणांना उâत येतो. ग्रामीण भागातील प्रश्नांना फार वेळ दिला जात नाही. हा पक्षपात थांबला पाहिजे, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली.