विनाकारण शिवसेनेच्या अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही!

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

भास्कर मोकल आणि शिवसेनेने केलेली विकास कामे यामुळे चिरनेर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सरपंच पदाचे उमेदवार भास्कर मोकल आणि शिवसेनेचे सर्वच्या सर्व पॅनेल निश्चित निवडून येईल असा विश्वास आमदार मनोहर भोईर यांनी शिवसेनेने आयोजित केलेल्या प्रचार रॅलीत केला. चिरनेर ग्रा.पं. निवडणूकीसाठी शिवसेनेविरोधात सगळे पक्ष एकत्र आले असले तरी चिरनेरची जनता सुज्ञ असून ते विकासाला निश्चितच साथ देतात. तसेच जर कोणी विनाकारण शिवसेनेच्या अंगावर आले तर त्याला निश्चितच शिवसेना शिंगावर घेईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

येत्या २६ डिसेंबरला चिरनेर ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. आज अखेरच्या टप्प्यात शिवसेनेने भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. गणपती मंदीरापासून सूरू झालेली ही रॅली संपूर्ण चिरनेर गावात फिरविण्यात आली. या रॅलीमध्ये आमदार मनोहर भोईर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, शिवसेनेचे सरपंच पदाचे उमेदवार भास्कर मोकल, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, चाणजे ग्रा.पं.सदस्य अमित भगत आणि शिवसेनेचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या