पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना अग्रेसर, आमदार सरनाईकांनी घेतलं दत्तक गाव

913

शिरोळ तालुक्याला महापुराच्या पाण्याने वेढा दिला आणि बघता बघता या महापुराने अनेक गावे उद्ध्वस्त केली. महापुराचे पाणी आता ओसरू लागले आहे. पाणी ओसरल्यानंतर तिथे अजूनच भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. ही भीषणता लक्षात घेऊन राज्यभरातील लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. पूरग्रस्त नागरिकांच्या अडचणी सोडवण्याकरिता आपल्या मदतीचा हातभार लागावा म्हणून ठाणेच्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक पुढे सरसावले आणि गावातील पूरग्रस्त नागरिकांना संसारउपयोगी साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. शिवाय एक गाव दत्तक ही घेतलं आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी हे पूरग्रस्त गाव दत्तक घेतलं आहे. या गावातील 325 कुटुंबांना लागेल ती मदत करण्याचं त्यांनी ठरवलं आहे आणि त्यानुसार मजरेवाडी येथील पूरग्रस्तांना तांदूळ, गहू, ज्वारी ,साखर, तेल, कडधान्य सह तिजोरी, बेड गादी, गॅस शेगडी, यासह संसारउपयोगी सर्व साहित्य दिले. गाव दत्तक घेऊन सर्वतोपरी मदत देणारे सरनाईक हे पहिलेच आमदार आहेत. पूरग्रस्त कुटुंबाची सर्व जबाबदारी घेऊन त्यांना लागेल ती मदत करण्याकरिता शसन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांच्या पूनर्वसनासाठी राज्याच्या विविध भागातून मदतीचा ओघ सुरू आहे. राज्य सरकारनेही केंद्राकडे मोठी मदत मागितली आहे. अनेक पक्षांकडूनही पूरग्रस्तांना मदत पूरवली जात आहे. मात्र मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून वैयक्तिक मदत मजरेवाडी येथील पूरबाधित ग्रामस्थांना संसार उपयोगी साहित्य देऊन करत आहे. या पुढील काळातही माझ्या कडून लागेल ती मदत या गावातील नागरिकांच्या साठी करू. या गावातील नागरिकांनी मला दिलेलं प्रेम मला प्रेरणा देत राहील, असे सरनाईक यांनी सांगितले.

या वेळी उल्हास पाटील म्हणाले, कर्नाटक मधील अलमट्टी धरण हे 518 मी असून ते 523 वर नेले आहे आणि जर पुढील काळात 523 मी पाणी साठा अलमट्टी ठेवणार असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. मी माझ्या तालुक्यातील नागरिकांच्या साठी अलमट्टीच्या विरोधात आंदोलन करणार, असे पाटील यांनी सांगितले.

यावेळी सरपंच सौ. मंगल नरुटे, उपसरपंच शंकर कागले, नगसेवक पराग पाटील, माजी सरपंच संजय अनुसे, भोला कागले, सचिन हेरवाडे, सुरेश गांवडी, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थेचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या