मध्यप्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही, इथली ‘पॉवर’ वेगळी – संजय राऊत

sanjay-raut-press

मध्य प्रदेशातील राजकीय भूकंपामुळे सध्या विविध चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर कॉग्रेसला राम राम केला. त्यांच्या सोबत 22 आमदारांनी देखील काँग्रेस मधून बाहेर पडत राजीनामा दिला. यामुळे कमलनाथ सरकार कधीही कोसळले अशी शक्यता आहे. या बातमी नंतर सोशल मीडियावर भाजप सार्थकांनी पुढला क्रमांक महाराष्ट्राचा असे अफवांचे ढोल बढवायला सुरुवात केली. मात्र महाराष्ट्राची ‘पॉवर’ वेगळी आहे असे म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या सगळ्या शक्यता फेटाळून लावून तडाखेबंद उत्तर दिले आहे.

‘महाराष्ट्राची ‘पाॅवर’ वेगळी आहे. एक ऑपरेशन शंभर दिवसापूर्वी फसले आहे.त्यानंतर महाविकास आघाडीने बायपास ऑपरेशन करून महाराष्ट्र वाचवला. मध्यप्रदेशचा वायरस महाराष्ट्रात घुसणार नाही. चिंता नसावी. जय महाराष्ट्र.’ असे संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या