शिवसेनेकडून मल्टीपॅरामॉनिटर, इन्फ्युजन पंपची ग्रामीण रुग्णालयाला भेट

241

शिवसेनेच्या प्रयत्नांनी आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याने जिल्हा नियोजनामधून कुडाळ ग्रामीण रुग्णालयाला मल्टीपॅरामॉनिटर व दोन इन्फ्युजन पंप अशी अत्याधुनिक उपकरणे देण्यात आली आहेत. रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या सोयीसुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही नाईक यांनी सांगितले. आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद वालावलकर व वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव घुर्ये यांच्याकडे ही उपकरणे सुपूर्द करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख राजन नाईक, सभापती नूतन आईर, उपसभापती जयभारत पालव, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, महिला आघाडी तालुका संघटक मथुरा राऊळ आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या