महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार व्यवस्थित चालणार, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास

1963
ajit-pawar-ncp

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या साथीने व सहकार्याने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात व्यवस्थित चालणार आहे, असा ठाम विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीवेळी त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका आणि सरकारची वाटचाल स्पष्ट केली.

या बैठकीत बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘राज्याच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या समाजाला योग्य न्याय देण्याचे काम या सरकारकडून होईल.’

‘वित्त व नियोजन खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. राज्याचा कारभार सांभाळताना अनेक अडचणी येतात पण आपण त्यावर मात करू.’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले. ‘आरक्षणाचा मुद्दा ही चर्चेत आहे. मागील सरकारकडून पाच वर्षांत हा प्रश्न बाजूला ठेवण्यात आला. यावर योग्य निर्णय घेण्याचे काम करू’, असंही त्यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या