टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, देशाचे उद्योग महर्षी, पद्मविभूषण रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला आहे. “टाटासाहेब पुढे अनेक वर्षे देशातील युवकांना प्रेरणा देत राहतील”, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
View this post on Instagram
”उद्योगक्षेत्रात भारताला रत्नाचे तेज प्राप्त करून देणारे कर्तृत्ववान आणि सहृदयी टाटासाहेब पुढे देखील देशातील युवकांना अनेक वर्षे प्रेरणा देत राहतील. त्यांचे फोटो काढण्याचे भाग्य आणि मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शनही मला लाभले’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी एनसीपीए येथे रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.