शिवसेनेने पुरग्रस्तांना पाठविल्या 500 टाक्या

1278

कोल्हापूर-सांगली, सातारा जिल्ह्यात आलेल्या पुरांमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले असून पिण्याचे पाणी साठविण्याचा ग्रंभीर प्रश्न निर्माण झाल्याने या नागरिकांना पिण्याचे पाणी साठवता यावे यासाठी शिवसेना संभाजीनगर शाखेच्यावतीने 500 टाक्या आज पाठविण्यात आल्या.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये पुरामुळे भीषन परिस्थिती निर्माण झाली असून पुरग्रस्ताच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असून शिवसेनेच्यावतीने सर्वेतोपरी मदत करण्याचे आश्वासन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेच्या प्रत्येक जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. संभाजीनगर जिल्ह्यातून पुरग्रस्तानां 500 पाण्याच्या टाक्या पाठविण्यात आल्या आहे. यावेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, शहर प्रमुख विजय वाघचौरे, उपशहर प्रमुख वसंत शर्मा, संजय बारवाल, विभागप्रमुख सुरेश गायके, प्रकाश कमलानी, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक अनीता मंत्री, उपविभागप्रमुख अभिजीत पगारे, बाबासाहेब आगळे शाखाप्रमुख विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर शेळके, अभिजीत अरकिडवार युवसेना उपशहर अधिकारी पराग कुंडलवाल, सूर्यकांत कुलकर्णी, अशोक गायके, गणेश सोलनकर आदींची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या