माजलगावात शिवसेनेच्या फिरत्या पीक विमा केंद्राचे चंद्रकांत खैरेंच्या हस्ते उद्घाटन

सामना प्रतिनिधी । माजलगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विमा शेतकऱ्यांना मिळत नाही हे पाहून मराठवाड्यात मदत केंद्र सुरू केले असून आठ दिवसांत वंचित शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल. यासाठी दोन दिवसांत फॉर्म भरून शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे. शेतकरी जगला तर प्रजा जगेल यासाठी शिवसैनिकांनी पुढाकाराने काम करावे असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. दुष्काळ प्रश्नी अग्रगण्य असलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांना विमा मिळण्यासाठी मदत व्हावी यासाठी फिरते विमा मदत केंद्र सुरू केले असून सोमवारी पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांचे हस्ते व संपर्कप्रमुख आनंद जाधव यांचे उपस्थितीत त्याचे उद्घाटन करण्यात आले, खैरे व जाधव यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.

बीड जिल्ह्यातील पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‛शेतकरी पीकविमा मदत केंद्र’ उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी पीकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांचे आधार, पॅन नसल्याने खाती बंद झाली आहेत त्याचीही माहिती शिवसैनिकांनी घेऊन शेतकऱ्यांना मोबदला मिळवुन देण्यासाठी तसेच खते, बियाणे योग्य दरात मिळावी यासाठी मदत करावी असेही खैरे म्हणाले. यावेळी संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी फिरते केंद्र केल्याचे कौतुक करून ग्रामीण भागात घरोघरी जाऊन मदत केंद्रा चे फॉर्म भरून घेऊन शिवसेना म्हणजे दुष्काळ गंभीर शिवसेना खंबीर हे दाखवून द्या असे आवाहन केले.

यावेळी संभाजीनगरचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, नगरसेवक विरभद्र गादगे, अतुल द्विवेदी, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, सुशील पिंगळे, बाळासाहेब अंबुरे, उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके, तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव, उद्धव नाईकनवरे, शहरप्रमुख पापा सोळंके, वडवणीचे विनायक मुळे, सुनील खंडागळे, अभिजित कोंबडे, विक्रम शिंदे, तीर्थराज पांचाळ, राजू शहाणे, विक्रम सोळंके, अतुल उगले, सुरज एखंडे यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.