‘एक नेता, एक व्यासपीठ, एक झेंडा, एक जागा’, उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनिल परब यांची प्रतिक्रिया

1966 पासून शिवसेनेचे ‘एक नेता, एक व्यासपीठ, एक झेंडा, एक जागा’ असे जे समिकरण होते त्याला आज उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे, अशी प्रतिक्रिया निकालानंतर माजी परिवहन मंत्री, शिवसेना विभागप्रमुख ऍड. अनिल परब यांनी दिली.

शिवसेनेच्या जोरदार युक्तीवादानंतर शिंदे गट आणि पालिकेचा युक्तीवाद फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर बोलताना ऍड. अनिल परब म्हणाले की, आम्ही आमचा अर्ज मुंबई महापालिकेकडे फार पूर्वी पाठवला होता. न्यायालयाने या बाबतीत पोलिसांना सक्त सुचना दिल्या आहेत. कारण कायदा-सुव्यवस्था सांभाळणे पोलिसांची जबाबदारी आहे आणि आमचीही जबाबदारी आहे. आम्ही न्यायालयात तसे सांगितले असून सर्व अटींचे पालन करू.

महापालिकेने जे काही आक्षेप नोंदवले होते यावरती महापालिकेच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने काही वक्तव्य केले आहेत. ती वक्तव्य आपल्याला निकालाची पूर्ण कॉपी मिळाल्यावर कळतील. पण महापालिकेने जे आक्षेप नोंदवले होते सर्व फेटाळून आज शिवसेनेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली, असे ऍड. अनिल परब म्हणाले.

”शिवसेनाप्रमुख 1966 पासून दसरा मेळावा शिवतीर्थावर घेत होते आणि त्यानंतर ही परंपरा उद्धव ठाकरे यांनी कायम राखली. परंतु काड्या करणारे लोक काड्या करत राहिले. बंड करणाऱ्या लोकांना न्यायालयाने चांगली चपराक लगावली.”

चंद्रकांत खैरे, माजी खासदार

”सत्य परेशान हो सकता पराजित नहीं. ‘सत्यमेव जयते’ या वाक्याचे हिंदुस्थानमध्ये किती महत्त्व आहे हे या एका निर्णयामुळे कळले.”

न्यायदेवतेचे आभार, आतातरी शिंदे गटाने शिवसेनेच्या मार्गात काळी मांजरं सोडणं बंद करावं! – राऊत

किशोरी पेंडणेकर, माजी महापौर

”उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. सर्व बाजू समजून घेऊन न्यायालयाने जो निर्णय दिला त्याबद्दल आभारी आहे. त्यामुळे परंपरेप्रमाणे विजयादशमीला शिवसेनेचा दसरा मेळावा वाजत-गाजत होईल.”

निलम गोऱ्हे, शिवसेना उपनेत्या