रवींद्र गायकवाड यांच्या कृत्याचं समर्थन नाही: संजय राऊत

3

सामना ऑनलाईन । मुंबई

‘शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या कृत्याचं शिवसेना पक्ष म्हणून कधीही समर्थन करणार नाही, पण आमच्या खासदारावर ही वेळ का आली याचा ही तपास झाला पाहिजे’, अशी कडक भूमिका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे.

‘कोणालाही मारणं हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम नाही. मात्र जिथे गरज आहे तिथे शिवसेना हात नक्कीच उचलणार’, अशा रोखठोक भाषेत त्यांनी शिवसेनेचा विचार मांडला.

मुंबई, दिल्ली सारख्या अनेक एअरपोर्ट वर प्रवाशांची लूट होते तेव्हा कुठे जाते यांची तत्परता, असा सवाल करत त्यांनी विमानतळावरील गैरसोयी आणि एअर इंडियाच्या सर्व्हिसवर जोरदार टीका केली. ‘सर्वसामान्य जनतेला देखील एअर इंडियाच्या सर्व्हिसमुळे मनस्तापाला सामोरं जावं लागतं. त्यांना न्याय मिळत नाही. आज गायकवाड हे केवळ खासदार आहेत म्हणून त्याची चर्चा सुरू झाली आहे. पण हा प्रश्न एका खासदाराचा नाही तर हजारों प्रवाशांना तसा अनुभव आहे’, असेही राऊत म्हणाले.

‘ज्या तातडीनं आमच्या खासदाराला फ्लाईट वर बॅन करण्याचे निर्देश देण्यात आले, त्याच तातडीनं एअर इंडियानं त्यांच्या सर्व्हिस सुधारण्याचे निर्देश दिले असते तर बरं झालं असतं’, असा सणसणती टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

‘रवींद्र गायकवाड यांच्यावर पक्ष म्हणून कारवाई करण्यापेक्षा कायदेशीर कारवाई जी व्हायची ती होईल’, असं त्यांनी स्पष्ट केलं.

एक प्रतिक्रिया

  1. सर्वज्ञ राऊत साहेबांनी, ‘नरो वा कुंज रो वा’ करण्या पेक्षा चौकशी करून योग्य भूमिका घ्यावी. कायदा सर्वोपरी असताना, हात उगारण्याची भाषा करणे म्हणजे कायदा हातात घेणे होते. गुडगाव मध्ये नवरात्री निमित्ताने मास-विक्री बंदी; शिवसैनिक रस्त्यात फिरून अमलात आणत आहेत. आपण जैनांच्या पर्वा-वेळी दाखवलेल्या ध्येय आणि तत्परता याच्या नेमके विरुद्ध तेथील वर्तन आहे. नक्की समाजाला काय दिशा देणार याचा खुलासा करावा !