शिव ठाकरे ठरला ‘बिग बॉस’चा विजेता!

1904

बिग बॉस मराठीच्या दुसऱया पर्वाचा विजेता कोण होणार  याची अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली होती. रविवारी पार पडलेल्या अंतिम फेरीत शिव ठाकरे विजेता ठरला. 17 लाख रुपये आणि बिग बॉसची ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दुसऱया क्रमांकावर नेहा शितोळेला तर तिसऱया क्रमांकावर वीणा जगताप हिला समाधान मानावे लागले.

मैत्री, भांडण, प्रेम, वाद आणि विविधांगी टास्क यामुळे दुसरा सीजन देखील चर्चेत होता. सगळी आव्हाने पार पाडत महाअंतिम फेरीत शिव ठाकरे, वीणा जगताप, शिवानी सुर्वे, किशोरी शहाणे, नेहा शितोळे आणि आरोह वेलणकर पोहचले. या सोहळय़ात घरातील सदस्यांसह घराबाहेर गेलेल्या सदस्यांनी परफॉर्मन्स करत सोहळ्याची रंगत वाढवली. अखेर सर्वांवर मात करत शिव ठाकरेने बाजी मारली. अमरावतीचा शिव ठाकरे हा रोडीज या शोमुळे चर्चेत आला होता. बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन होण्याचा मान शिवने मिळवला होता. त्यानंतर टास्कमध्ये चांगली कामगिरी करत तो नॉमिनेशनपासूनही वाचत होता.

आपली प्रतिक्रिया द्या