प्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग : शिवा थापाला सुवर्णपदक, हिंदुस्थानला चार पदके

210

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

चार वेळा आशियाई चॅम्पियन ठरलेल्या हिंदुस्थानच्या शिवा थापाने प्रेसिडेंटस् कप बॉक्सिंग स्पर्धेच्या 63 किलो गटात आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना सुवर्णपदक जिंकले. कझाकिस्स्तानच्या अस्तानामध्ये शनिवारी संपलेल्या या स्पर्धेत हिंदुस्थानने एक सुवर्ण, एक रौप्य व दोन कास्य अशी एकूण चार पदके मिळविली.

सुवर्णपदकाच्या लढतीत यजमान देशाचा झाकीर सफीउल्लीनने दुखापतीमुळे माघार घेतल्याने शिवा थापाला सुवर्णपदक बहाल करण्यात आले. हिंदुस्थानला 2006 नंतर प्रथमच या स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले. झाकीरला उपांत्य लढतीत कपाळाला दुखापत झाली होती. 19 वर्षीय महिला बॉक्सर प्रवीण कुमारने 60 किलो गटात हिंदुस्थानला रौप्यपदक जिंकून दिले. दुर्योधन सिंह नेगी (69 किलो) व स्विटी बुरा (81 किलो) या हिंदुस्थानी खेळाडूंना उपांत्य लढतीत हार पत्करावी लागल्याने कास्यपदकावर समाधान मानावे लागले.

आपली प्रतिक्रिया द्या