जयसिंगपुरात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

58

सामना प्रतिनिधी । जयसिंगपूर

महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४३ वा राज्याभिषेक दिन जयसिंगपूर येथे स्वराज्य क्रांती, शिवयोग फौंडेशन व शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने लोकसहभागातून साजरा झाला. जयसिंगपूर नगरपालिकेसमोर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आवतन, अक्षत, उदयस्तु या मंत्रपाठाने काशिनाथ चौगुले यांनी राजपदाची घोषणा केली. श्रीमती पारूबाई हेगडे या ज्येष्ठ सफाई कर्मचारी महिलेने अभिषेक केला. पुष्प, गंध, अक्षता, लाह्या यांनी शिवरायांना मस्तकाभिषेक झाला. राजछत्र, राजदंड अनुक्रमे सचिन इंगवले व करन हिटनाळे यांनी प्रदान केला. शिवपुत्र जीवन पाटील यांनी भगवाध्वज फडकावून स्वराज्याची घोषणा केली.

महिलांनी पारंपारिक वेषभूशेत ओवाळणी केली. कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांच्यासह शिवभक्त, तरूण मंडळाचे कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन आदम मुजावर, इकबाल इनामदार, राजू चौगुले, सुनील ताडे, रघुनाथ देशिंगे यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या