महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांचे निधन

2326

राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांचे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. पुण्यातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना किडनी विकारावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 16 जुलै रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी ते कोरोनामुक्त झाले होते.

काँग्रेस पक्षाने त्यांच्या निधनाबद्दल खेद व्यक्त केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून याबाबतचे ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे काँग्रेस विचारधारेचे खंदे समर्थक आणि समाजसेवेला समर्पित जुने-जाणते नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
काँग्रेस पक्ष त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या