शिवडी विधानसभा मतदारसंघासाठी केईएम आणि गांधी रुग्णालयात होणार लसीकरण

शिवडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी कोरोना लसीकरणात मोठय़ा संख्येत सहभागी व्हावे यासाठी आमदार अजय चौधरी यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्याच्या प्रयत्नांतून शिवडी विधानसभेतील नागरिकांसाठी केईएम आणि महात्मा गांधी रुग्णालयात मोफत कोविड लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेस प्राधान्य देताना आमदार अजय चौधरी यांनी शिवसेना शाखेत लसीकरण नोंदणी कक्ष आणि मार्गदर्शन कक्ष सुरु केले आहे. याबरोबरच घरोघरी जाऊन 45 वर्षांवरील नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याकरिता विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.

तसेच नागरिकांना कोरोना लसीकरण केंद्रावर पोहचविण्याची व्यवस्था देखील शिवसेना शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, जास्तीत जास्त नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता शिवसेना शाखेत लसीकरणासाठी नोंदणी करावी, असे आवाहन अजय चौधरी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या