“शिवगंधार” तर्फे ‘आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या निमित्ताने ‘जनी म्हणे’… मालिका

jani-mhane

आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या निमित्ताने रविवार दि. 7 मार्च 2021 सकाळी 9 वाजता “शिवगंधार” तर्फे ‘शिवगंधर्व’ पं.शिवानंद पाटील यांच्या षष्ट्यब्दपूर्ति निमित्ताने यु-ट्युब आणि सर्व सोशल मीडियावर ‘संतप्रिया’ मालिकेत जनी म्हणे… ( पुष्प पहिले ) ही भक्तिसंगीत मैफील सादर होत आहे. त्या नंतर पुढे दर रविवारी सकाळी 9 वाजता जनी म्हणे ही मालिकेद्वारा संत कवयित्री जनाबाई यांचे 12 एपिसोड सादर होत राहतील.

या मालिकेची संकल्पना, निर्मिती आणि गायन योजना शिवानंद यांचे आहे. तरुण पिढीतील गायिका सानिका देवधर आणि स्नेहा काणे यांनी त्यांना स्वरसाथ केली आहे. संत जनाबाई यांच्या पूर्वी प्रसिद्ध न झालेल्या आणि नव्याने संगीत दिलेल्या रचना त्या गाणार आहेत. संत जनाबाई यांच्या प्रासादिक रचनेला प्रतिभावान संगीतकार पं. यशवंत देव, पं. प्रभाकर जोग, पं. केदार पंडित आणि डॉ. सुनील कट्टी यांनी संगीताचा साज चढवला आहे.

विशेष म्हणजे या मालिकेत जनाईच्या जीवनाविषयीचा संवाद लेखक पत्रकार मुकुंद कुळे करणार असून जनाईच्या काव्याविषयीचा संवाद प्रा.मीना गोखले करत आहेत. संत कवयित्री जनाबाई हिच्या जीवनाचा, काव्याचा आणि अभंग गायनाचा हा त्रिवेणी संगम या मैफिलीत झालेला आहे. आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या निमित्ताने स्त्री संत जनाबाई यांना केलेला हा मानाचा मुजरा! या मालिकेचे प्रायोजक आहेत युनियन बँक ऑफ इंडिया.

आपली प्रतिक्रिया द्या