मरोळच्या उत्सवात पर्यावरण संरक्षण, सर्वधर्मसमभाव

अंधेरी मरोळ येथील शिवगर्जना तरुण मित्र मंडळाच्या गणेशोत्सवात पर्यायरण संरक्षण आणि सर्वधर्मसमभाव यांचे दर्शन घडत आहे. मंडळाने या वर्षी कागदाच्या लगद्यापासून मूर्ती बनवली आहे. या उत्सवात हिंदू, मुस्लिम, पारसी आणि ख्रिश्चन अशा सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडते. शिवगर्जना मंडळाची ही आकर्षक मूर्ती मंडपात विराजमान होण्यासाठी गणेश चित्रशाळेतून रवाना झाली.