पूर्व उपनगरात दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या गोविंदांच्या मदतीसाठी शिवसैनिक धावून गेले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ईशान्य मुंबई विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जखमींना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी त्यांच्या मदतीसाठी शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रपाल चंदेलिया, माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी, प्रसाद कामतेकर, विलास लिगाडे, सचिन भांगे, गोपाळ सोनी, चंद्रकात हळदणकर धावून आले. हंडी फोडताना जखमी झालेले अवतार सिंग (11), अमन कसबे (14), विनायक जैसवार (6), साईराज वावस्कर (14), रहमान शेख (9), आरव निकाळजे (12) यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले. शिवसैनिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले.