उद्धव ठाकरेंच्या निर्णयाच्या निर्णयाचे पनवेलमध्ये जोरदार स्वागत

38

सामना ऑनलाईन, पनवेल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी गोरेगाव येथील गटनेत्यांच्या मेळाव्यात यापुढे शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले, त्यांच्या या निर्णयाचे पनवेल तालुक्यातील शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले. या घोषणेनंतर शिवसैनिकांनी ठिकठिकाणी फटाके फोडून आणि मिठाई वाटप करून स्वागत केले

शिवसैनिकांच्या भावना उद्धवजींनी जाणून घेवून यापुढे सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केल्याने शिवसैनिकांमध्ये मोठय़ा प्रमाणात उत्साहात संचारला आहे. या त्यांच्या निर्णयाचे शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील, रमेश गुडेकर, शिरिष बुटाला, उपजिल्हाप्रमुख शिरिष घरत, तालुकाप्रमुख वासुदेव घरत, रामदास पाटील, संघटक दिपक निकम, शहरप्रमुख प्रथमेश सोमण, देवीदास पाटील, डी.एन.मिश्रा, धाया गोवारी, गुरुनाथ पाटील, लीलाधर भोईर, संघटक अच्युत मनोरे यांच्यासह महिला आघाडी, युवा सेना, ग्राहक संरक्षण कक्ष व विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री रस्त्यावर उतरुन तसेच शाखेजवळ जमून फटाके फोडून तसेच मिठाई वाटप करून या निर्णयाचे स्वागत केले व आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भगवा फडकावयाचाच हाच निर्धार त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या