शिवसेनेच्यावतीने बुर्‍हानगर येथील तुळजाभवानी देवी मातेस ‘साडी-चोळी’ अर्पण

सालाबादप्रमाणे तिसर्‍या माळेनिमित्त नगर शहर शिवसेनेच्यावतीने बुर्‍हानगर येथील तुळजाभवानी देवी मातेस ‘साडी-चोळी’ अर्पण करण्यात आली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले, बुर्‍हानगर येथील तुळजाभवानी देवी ही नवसाला पावणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या देवीचे महात्म्य सर्वदूर पोहचले आहे. देवीच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे नवरात्रात राज्यभरातून भाविक या ठिकाणी येतात. अनिलभैय्या राठोड यांनी नगर शहर शिवसेनेच्यावतीने नवरात्रात दरवर्षी देवीला साडी-चोळी अर्पण करण्याची परंपरा सुरु केली, ती आजही कायम असून, मोठ्या उत्साहात शिवसैनिक मनोभावे देवीच्या दर्शनासाठी येतात.

विक्रम राठोड यांनीही बुर्‍हाणनगर देवीची शिवसेनेच्यावतीने नवरात्रोत्सवात चाडी-चोळी देऊन ओटी भरण्यात येते. ही परंपरा कायम सुरु राहणार असून, देवीची सर्वांवर कृपादृष्टी अशीच राहू दे, अशी प्रार्थना केली. सनई-चौघड्यासह वाजत-गाजत शिवालयापासून निघून बुर्‍हाणनगर येथे शिवसैनिक गेले होते. तेथे उपस्थितांच्या हस्ते आरती करण्यात आली.

याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, सुरेखा कदम, महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर, शहराध्यक्षा अरुणा गोयल, नगरसेवक शाम नळकांडे, संतोष गेनप्पा, संदिप दातरंगे, पप्पू भाले, गौरव ढोणे, दिपक कांबळे, अभिजित अष्टेकर, भाकरे महाराज, सुमित धेंड, मृणाल भिंगारदिवे, मुक्ता मेटे, उषा ओझा, डॉ.श्रीकांत चेमटे आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.