कर्जमाफीसाठी लोकसभेतही शिवसेनेचा ‘आवाज’

31

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने महाराष्ट्र विधिमंडळात फडणवीस सरकारला धारेवर धरले असतानाच आज लोकसभेतही शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीची मागणी धसास लावली.
जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत महाराष्ट्रात तब्बल २६२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने राज्यातील शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी शून्य प्रहरात केली.

महाराष्ट्रात आम्ही कुठेही गेलो तरी आमचे कर्ज माफ करा अशीच मागणी शेतकरी करताना दिसतो. शेतकऱ्यांची अवस्था भयावह आहे. सरकारने तातडीने पावले उचलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी खैरे यांनी यावेळी केली. त्यांच्या मागणीला खासदार विनायक राऊत, श्रीरंग बारणे, प्रताप जाधव, राहुल शेवाळे व हेमंत गोडसे यांनी अनुमोदन दिले.

आपली प्रतिक्रिया द्या