मुंबई राखणारच-उद्धव ठाकरे 

184771

मुंबई – येत्या फेब्रुवारीत महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका राखणारच. त्याचबरोबर महाराष्ट्रातील महापालिकांवरही भगवा फडकलाच पाहिजे, जास्तीत जास्त महापौर शिवसेनेचे झाले पाहिजेत! आता हेच आपले लक्ष्य असून त्यादृष्टीने कामाला लागा, असा आदेशच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

खान्देशातील धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांनी आज शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारीत होणार्‍या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका हे शिवसेनेचे लक्ष्य असल्याचे स्पष्ट केले.

परिस्थिती बिकट आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत मुंबई तर राखणारच त्याचबरोबर राज्यातील इतर महापालिका व जिल्हा परिषदांवरही भगवा फडकवण्यासाठीही शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे, असा आदेशच त्यांनी शिवसैनिकांना दिला. ‘सबका साथ सबका विकास’ हे असले काही नाही, पण भगव्याची शान वाढवण्यासाठी तुमची ताकद हवी आहे. या ताकदीचा उपयोग तुमच्यासाठीच करेन, असा शब्दही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.

मोदीबाबांनी मृगजळ दाखवले
ग्रामीण भागात फाणीटंचाई निर्माण झाली की मग काखेला कळसा लावून गावभर फाणी मिळेल तिथे जायचं. चफला नाही…काट्याकुट्यातून वाट काढत जायचे. या मेहनतीनंतर निदान फाणी मिळणार हे तरी माहीत असते; फण आफल्या मोदीबाबांनी या ग्रामीण महिलांना डांबरी रस्त्यावर आणले आहे. थोडा त्रास सहन करा. रस्ता ताफलाय माहीत आहे. फाय भाजतायत कळतेय, फण ते मृगजळ बघा. तिथफर्यंत जा. फाणी मिळेल म्हणून त्या बिचार्‍या त्या दिशेने चालल्यात, फण चालणं काही संपत नाही अन् फाणी काही मिळत नाही. आमच्या मायभगिनींची ही जी फायफीट चाललीय ती फायफीट संफवायचीय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या