शिपाई, परिचर भरतीसाठी लेखी परीक्षा घेताच कशाला?

23

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई महानगरपालिकेत १३८८ चतुर्थ श्रेणी पदांच्या भरतीसाठी घेतलेल्या लेखी परीक्षेत एमपीएससी दर्जाचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. शिपाई, परिचर, आया, हमाल अशा पदांसाठी ही भरती होणार असताना इतक्या काठिण्य पातळीची लेखी परीक्षा का घेता, असा सवाल शिवसेनेने केला आहे.

पालिकेतील चतुर्थ श्रेणी पदांसाठी शारीरिक क्षमतेची चाचणी आवश्यक आहे. ही परीक्षा पालिकेने आपल्या अधिकारात घेणे आवश्यक आहे. असे असताना प्रशासनाकडून ‘टाटा कन्सलटन्सी’ या खासगी कंपनीमार्फत भरती प्रक्रिया राबवण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केला आहे. या प्रचंड काठिण्य पातळीमुळे खरे गरजू या नोकरीपासून वंचित राहिले असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या