हिंगोलीत पक्ष निरीक्षकांनी घेतली शिवसेना आढावा बैठक

25

सामना प्रतिनिधी । हिंगोली

शाखाप्रमुख ते तालुका व जिल्हास्तरीय शिवसेनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत प्रत्यक्ष सविस्तर संवाद साधून शिवसेनेचे पक्ष निरीक्षक व बीडचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी हिंगोली विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. आगामी काळातील शिवसेनेचे निवडणूक विषयक रणनिती आणि पक्षाच्या तयारीबाबत गाव पातळीवरील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यात येत असल्याचे पक्ष निरीक्षक अनिल जगताप यांनी दैनिक सामना प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. दरम्यान, हिंगोली विधानसभा क्षेत्राच्या आजच्या या संवाद बैठकीला शिवसैनिकांनी व पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी तुडूंब गर्दी केली होती.

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या तीन विधानसभा क्षेत्रासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व मराठवाडा विभागीय संपर्क नेते, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या आदेशानुसार बीडचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांना पक्ष निरीक्षक म्हणुन पाठविण्यात आले असून आजपासुन पुढील तीन दिवस जगताप हे हिंगोली जिल्ह्यात तळ ठोकून आढावा घेणार आहेत. माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचे हिंगोलीत आगमन होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, शहरप्रमुख अशोक नाईक, तालुकाप्रमुख कडुजी भंवर, जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश उर्फ भैय्या पाटील गोरेगावकर, कृऊबाचे माजी सभापती रामेश्वर शिंदे, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, संतोष देवकर, जि.प.चे माजी उपाध्यक्ष उध्दवराव गायकवाड, विधानसभा संघटक डॉ. रमेश शिंदे, नगरसेवक सुभाष बांगर, राम कदम, जि.प. सदस्य गणाजी बेले, शिवाजी कऱ्हाळे, युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी दिलीप घुगे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, जि.प. सर्कलप्रमुख, पं.स. गणप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक उपस्थित होते. मेळावा, बैठक अशा पारंपारिक कार्यक्रमातील भाषणांना फाटा देत पक्ष निरीक्षक व बीडचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी बंद दाराआड प्रत्येक जि.प. व पं.स. सर्वâलनिहाय गणप्रमुख, शाखाप्रमुख व स्थानिक प्रमुख कार्यकत्र्यासोबत व्यक्तीश: व वन टु वन संवाद साधला. शिवसैनिकांच्या व जनतेच्या आगामी काळातील अपेक्षा, शिवसेनेची सध्याची संघटनात्मक स्थिती, शिवसेनेचे सध्या स्थितीतील कार्य, ग्रामीण भागातील प्रमुख प्रश्न व अडीअडचणी सोडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत प्रत्येकाशी जगताप यांनी चर्चा केली.

हिंगोली विधानसभा क्षेत्रातील सेनगाव व हिंगोली या दोन तालुक्यातील १६ जिल्हा परिषद सर्कल व ३२ पंचायत समिती गणातील कार्यकत्र्यांशी दिवसभर चर्चा केली. यावेळी त्याच्या समवेत बीड येथील युवासेनेचे युवराज बांगर हे देखील उपस्थित होते. दरम्यान, पक्ष निरीक्षक अनिल जगताप बोलतांना म्हणाले की, आज हिंगोली, उद्या २२ फेब्रुवारी रोजी कळमनुरी तर २३ फेब्रुवारीला वसमत विधानसभा मतदारसंघातील संवाद बैठक घेतली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या