कोपरगावात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सुभाषचंद्र यांना अभिवादन

31

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरातील रिक्षा स्‍टॅन्‍ड चौक ते अंहिसा चौक परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘शिवसेना जिंदाबाद’, ‘शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी दुमदुमून गेले होते.

रिक्षा स्‍टॅन्‍ड चौक व अहिंसा चौक या दोन्‍ही ठिकाणी व्‍यासपीठ उभारून हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. रिक्षा स्टॅन्‍ड चौकात शहरप्रमुख असलम शेख, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, प्रमोद लबडे आदींसह शिवसैनीक मोठया संख्येने उपस्थित होते. तर अहिंसा चौकात युवासेना शहरप्रमुख सनी वाघ ,अजिनाथ ढाकणे आदीसह शिवसैनीक मोठ्या संख्येने हजर होते. आमदार स्‍नेहलता कोल्‍हे यांनी भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह रिक्षा स्टॅन्‍ड व अहिंसा चौकात जाऊन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी नगरपालिकेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कोपरगाव शहरात शहरप्रमुख असलम शेख यांच्‍या नेतृत्‍वाखाली शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले. मूकबधीर विद्यालय येथे विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, टूथब्रश व टुथपेस्‍टचे वाटप करण्यात आले. युवासेनेच्‍या वतीने साईचरित्र देऊन पत्रकारांचा सन्‍मान करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या