शिवसेनेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी घेतले रामगिरी महाराजांचे आशीर्वाद

64

सामना प्रतिनिधी । वैजापूर

नगरपालिका निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या शिवसेनेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सय्यद तशफा अजहर अली यांनी मंगळवारी सराला बेटातील पंचक्रोशीतील भक्तांचे शक्तिपीठ असलेले सदगुरू गंगागिरी महाराज व सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर मठाधिपती हभप रामगिरी महाराज यांचे पूजन केल्यानंतर महाराजांनी सय्यद तशफा अजहरअली यांना आशीर्वाद दिले.

नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर शिवसेना नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे व जिल्हाप्रमुख, माजी आमदार आर.एम. वाणी यांच्या सूचनेनुसार उमेदवारांच्या प्रचारास सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्या सून तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सय्यद तशफा अजहरअली यांनी प्रचाराच्या शुभारंभाकरिता सराला बेटावर जाऊन सद्गुरू गंगगिरी महाराज व नारायणगिरी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. मठाधिपती ह.भ.प. रामगिरी महाराज यांचे पूजन करून दर्शन घेतले. महाराजांनी त्यांना यावेळी आशीर्वाद दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष साबेर खान, संगीता रमेश बोरनारे, सीमा बाबासाहेब जगताप, वर्षा संजय बोरनारे, सुलतान खान, अमीर अली यांची यावेळी उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या