शिवसेनेच्या रणरागिणीकडून एमआयएमचा गड उद्ध्वस्त

5267

भायखळा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी एमआयएमचा गड उद्ध्वस्त केला आहे. यामिनी जाधव यांचा सामना भायखळ्याचे विद्यमान आमदार आणि एमआयएमचे उमेदवार वारीस पठाण यांच्याशी होता. यामिनी जाधव यांनी वारीस पठाण यांचा दारूण पराभव केला आहे.

संभाजीनगरात भगवा फडकला, महायुतीच्या झंझावातापुढे विरोधकांचा चुराडा

संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेना-भाजप महायुतीने निर्विवाद वर्चस्व दिसून आले आहे. जिल्ह्यात भगवा फडकला असून शिवसेनेने सहा जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे, तर भाजप तीन जागांवर विजयी झाला आहे. जिल्ह्यात महाआघाडीने 9 जागा बहुमताने ताब्यात घेतले आहे. #ElectionResults2019 – विजयी उमेदवारांची नावे वाचा एका क्लिकवर संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेना-भाजपा-रासप-रयतक्रांती महायुतीचे 9 विधानसभा मतदारसंघात उमेदवार रिंगणात उतरले होते.

2014 च्या निवडणुकीत वारीस पठाण एमआयएमच्या तिकीटावर भायखळा मतदारसंघातून निवडून आले होते. यंदाच्या निवडणूकीत यामिनी जाधव वारीस पठाण यांच्या विरोधात उभ्या होत्या. यामिनी जाधव यांना 51 हजार 180 मते मिळाली. तर वारीस पठाण यांना 31 हजार 157 मते मिळाली. जाधव यांनी पठाण यांचा 20 हजार 23 मताधिक्यांनी पराभव केला.

 

आपली प्रतिक्रिया द्या