शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी मराठवाड्यात

51

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवार, ४ फेब्रुवारी रोजी मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. पक्षप्रमुखपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच मराठवाड्यात येत असून संभाजीनगर व जालना जिल्ह्यात ते शेतकरी मेळाव्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी दिली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे रविवारी सकाळी ११ वाजता मुंबई येथून विमानाने संभाजीनगर येथे आगमन होईल. विमानतळावरूनच ते पैठणकडे प्रयाण करतील. शिवसेना आमदार संदिपान भुमरे अध्यक्ष असलेल्या शरद सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी १२ वाजता उद्धव ठाकरे हे शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करतील. विहामांडवा येथील कार्यक्रम आटोपून उद्धव ठाकरे हे पाचोड, वडीगोद्रीमार्गे घनसावंगीकडे प्रयाण करतील. घनसावंगी येथे दुपारी ३ वाजता विजय राजे देशमुख क्रिकेट मैदानावर होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास ते मार्गदर्शन करतील. मेळाव्यानंतर सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. घनसावंगी येथून दुपारी ४.३० वाजता अंबड, जालना मार्गे ते संभाजीनगरकडे प्रयाण करतील. सायंकाळी ६ वाजता चिकलठाणा विमानतळावरून खासगी विमानाने ते मुंबईकडे रवाना होतील.

शरद सहकारी साखर कारखान्याच्या गळिताचा शुभारंभ
स्थळ – विहामांडवा

वेळ – दुपारी १२ वाजता

शेतकरी मेळावा
स्थळ – घनसावंगी

वेळ – दुपारी ३ वाजता

आपली प्रतिक्रिया द्या