भाऊ चौधरी शाईफेक प्रकरणानंतर शिवसेनेचा डोंबिवली बंदचा इशारा

52

सामना ऑनलाईन, डोंबिवली

रावसाहेब दानवे यांचा निषेध करत त्यांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढणाऱ्या डोंबिवली शहरप्रमुख भाऊ चौधरी यांच्यावर भाजपा कार्यकर्त्यांनी भ्याड शाईहल्ला केला. या घटनेचा जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी निषेध केला आहे. शाईहल्ला करणारा भाजपा नगरसेवक महेश पाटील आणि त्याच्या सहकाऱ्यांविरूद्ध कारवाई केली नाही तर शनिवारी डोंबिवली बंद करण्यात येईल असं लांडगे यांनी म्हटलं आहे.

भ्याडपणे शाईहल्ला करून पळून गेलेल्या भाजपावाल्यांच्या अॅक्शनवर डोंबिवलीमध्ये ताबडतोब रिअॅक्शन दिसली. गुरूवारी मध्यरात्री भाजपा कार्यालयावर तुफान दगडफेक करण्यात आली. भाऊ चौधरी यांनी दानवे यांनी शेतकऱ्यांना शिवी दिल्याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढली होती.

आपली प्रतिक्रिया द्या