शिवसेना उपतालुकाप्रमुखावर खुनी हल्ला

सामना प्रतिनिधी । नारायणगाव

शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख राजाराम कोंडाजी चव्हाण यांच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून तीनजणांनी त्यांच्यावर लाकडी दांडके, लोखंडी पाइपने हल्ला केला. काल सायंकाळी ही घटना घडली. हल्ल्यामागचे कारण समजू शकले नाही. राजाराम कोंडाजी चव्हाण (वय ४०, रा. वडज, ता. जुन्नर) हे यामध्ये गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जुन्नर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या

नारायणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजाराम चव्हाण हे वडज गावावरून नारायणगावला दुचाकीवरून निघाले होते. वाणी मळा येथील शरद वाणी यांच्या डाळिंबाच्या बागेजवळ तीनजण थांबले होते. यापैकी एका आरोपीने चव्हाण यांना दुचाकी थांबविण्यास सांगितले. त्यांच्या गाडीतील पेट्रोल संपले असेल किंवा त्यांची गाडी बंद पडली असावी म्हणून चव्हाण यांनी मदतीच्या हेतूने आपली दुचाकी थांबविली. त्याच क्षणी तिघांपैकी एकाने त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकली. चव्हाण यांना लोखंडी पाइप व दांडक्याने डोक्याला, तोंडावर व अंगावर मारहाण केली. यात राजाराम चव्हाण गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या