कर्नाटक सरकारविरोधात महाराष्ट्र प्रेमींचा संताप, दिलं चोख उत्तर

29

सामना ऑनलाईन । पुणे

कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी महाराष्ट्रविरोधी गरळ ओकली होती. त्याचा समाचार शिवसैनिकांनी आपल्या स्टाईममध्ये घेतला आहे. कर्नाटक सरकार आणि बेग यांच्याविरोधात शिवसेना, युवासेनेच्या वतीने पुण्यात स्वारगेट बस स्थानकात कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून निषेध नोंदवला आहे. महापालिकेतील गटनेते संजय भोसले, नगरसेवक विशाल धनवडे, युवा सेनेचे शहराधिकारी किरण साळी, महापालिकेचे माजी गटनेते अशोक हरणावळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ठाण्यातील खोपट डेपोत अशाच प्रकारचं आंदोलन शिवसैनिकांनी केलं.

फोटो- चंद्रकांत पालकर
फोटो- चंद्रकांत पालकर

कर्नाटक सरकारने आता नवा कानडी कायदा करण्याची खेळी करून यापुढे सार्वजनिक कार्यक्रमात तसेच विधानसभेतही ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यास बंदी घालण्यात येणार आहे. तसेच मराठी भाषिकांना कर्नाटकविरोधात घोषणा देण्यास बंदी घालण्यात येणार आहे. असं केल्यास लोकप्रतिनिधींचे पदच रद्द करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा कायदा येणार असल्याची माहिती कर्नाटकचे नगरविकासमंत्री रोशन बेग यानी दिली होती. यामुळे सीमाभागात संतापाची लाट उसळली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या