शिवसेनाचा दणका, देवीदेवतांच्या चित्रांचे परिपत्रक मागे घेतले

28

सामना ऑनलाईन। मुंबई

शिवसेनेच्या दणक्याने हादरलेल्या राज्य सरकारने सरकारी कार्यालयातून देवदेवतांची चित्र काढण्याचे परिपत्रक मागे घेतले आहे. आज शुक्रवारी सकाळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या निवास्थानी जाऊन भेट घेतली.यावेळी आमदार सुभाष देसाई,रामदास कदम, दिवाकर रावते, आणि डॉक्टर दिपक सावंत यांनी सदर पत्रकाबददल तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.

त्यावर हे परिपत्रक ग्रामविकास विभागाच्या अधिका-याने काढले आहे, हे सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक नाही त्यामुळे ते रद्द करीत असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच संबंधित अधिका-यांवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या