हिंदुंचे संरक्षण करायचे नाही का? शिवसेनेचा संतप्त सवाल

47

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

किरकोळ कारणावरून शुक्रवारी धर्मांधांनी शहरात उच्छाद मांडला. ही दंगल पूर्वनियोजितच होती. या हिंसाचारात एका हिंदुस जिवंत जाळण्यात आले. राजाबाजार, शहागंजातील हिंदुंच्या मालमत्तांवर दंगलखोरांनी नांगर फिरवला. मुस्लिमांच्या झुंडी रस्त्यावर उतरून उत्पात माजवत असताना आम्ही हिंदुंचे संरक्षण करायचे नाही का? असा संतप्त सवाल शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रभारी पोलीस आयुक्तांना केला.

शहरात उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या वतीने प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना निवेदन देऊन दंगलखोर धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात ही दंगल पूर्वनियोजित असल्याचा आरोप करण्यात आला असून पोलीस तसेच हिंदुंना जाणीवपूर्वक निशाणा बनवण्यात आल्याचे म्हटले आहे. शहर शांत राहण्यासाठी दंगलखोरांना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच ज्या हिंदु वस्त्यांना दंगलीची झळ पोहोचली आहे, तेथे तात्काळ बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. भविष्यात हिंदु वस्त्यांना निशाणा बनवण्यात आल्यास त्यांना शिवसेनेच्या वतीने जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

या शिष्टमंडळात शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख जयवंत ओक, अनिल पोलकर, संतोष जेजूरकर, राजू राठोड, राजेंद्र अदमाने, गणेश चोपडे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, सभागृह नेता विकास जैन, युवासेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ, विधानसभा संघटक राजू वैद्य, सुशील खेडकर, गोपाळ कुलकर्णी, महिला आघाडीच्या संपर्क संघटक कला ओझा, सहसंपर्क संघटक सुनीता आऊलवार, जिल्हा संघटक रंजना कुलकर्णी आदींसह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती.

शिवसैनिकांमुळे शहर वाचले – खासदार खैरे
शहरात मुस्लिमांची दादागिरी वाढली आहे. हिंदुंना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. एकाच वेळी मुस्लिमांच्या झुंडी रस्त्यावर उतरून दगडफेक करतात. हा सगळा प्रकारच संशयास्पद आहे. आम्ही कोणत्याही जातीधर्माच्या विरोधात नाही. शिवसैनिक रस्त्यावर उतरले नसते तर शहर वाचले नसते. यापुढे जर हिंदुंच्या केसालाही धक्का लागला तर ते खपवून घेतले जाणार नाही.

  • शिवसेनेच्या मागण्या
  • धर्मांध दंगेखोर मुस्लिमांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
  • दंगलीची झळ पोहोचलेल्या हिंदु वस्त्यांना तातडीने संरक्षण देण्यात यावे.
  • जगनलाल बन्सिले यांना जाळणारांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

आता हिंदु मार खाणार नाही
ही दंगल पूर्वनियोजितच होती. एका रात्रीत हजारो पेट्रोलबॉम्ब बनवता येत नाहीत. शिवसैनिकांनी दंगलखोरांची टोळधाड रोखली नसती तर शहरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असती. आता हिंदु मार खाणार नाही, जशास तसे उत्तर दिले जाईल. विरोधी पक्षनेता फिरोजखान या दंगलीचा मास्टरमाइंड आहे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. – प्रदीप जैस्वाल, महानगरप्रमुख

मनपाची कारवाई कायद्यानुसार
न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदा नळकनेक्शन तोडण्याची कारवाई चालू आहे. कायदेशीर कारवाईला अशा पद्धतीने विरोध होणार असेल तर मनपाने कामच करायचे नाही का? शहागंजातील टपऱ्यांची लीज संपली आहे. या अवैध टपऱ्यांचा वाहतुकीला त्रास होतो, विशेषतः महिलांना. मनपाने शिस्त लावायचीच नाही का? – नंदकुमार घोडेले, महापौर

बन्सिलेंना जाळणारांवर खुनाचा गुन्हा दाखल करा
शुक्रवारी रात्री जे घडले ते युद्धच होते. संपूर्ण शहर पेटवण्याच्या इराद्यानेच झुंडी रस्त्यावर उतरल्या होत्या. पोलिसांवर हल्ले करण्यात आले. आम्ही पोलिसांना संरक्षण दिले. शहर शांत ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. बन्सिले यांना जाळणारांवर गुन्हे कधी दाखल होणार? – अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख

या झुंडी कुठून आल्या?
गल्लीबोळातून अचानक आलेल्या या झुंडी कोठून आल्या? दिसेल त्यावर या जमावाने हल्ला केला. शहागंजातील चंद्रसागर जैन धर्मशाळेत दुसऱ्या मजल्यावर काही जण जिवाच्या भयाने लपले. शिवसैनिकांनी धीर देऊन त्यांना तेथून बाहेर काढले. नसता तेथे आक्रितच घडले असते. – बाळासाहेब थोरात, शहरप्रमुख

आपली प्रतिक्रिया द्या