शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नांवर शिवसेना आक्रमक रहाणार

सामना प्रतिनिधी । जालना

जिल्ह्यात शिवसेनेने संघटनात्मक बांधणीबरोबरच शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने केली असून शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नांवर शिवसेना आक्रमक रहाणार असल्याचे आज शिवसेनेच्या झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी सांगितले. जालना विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश काळे, परतुर विधानसभा संपर्कप्रमुख देवा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना शहरातील नगरसेवक, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख व महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जि.प. अध्यक्ष यांच्या निवासस्थानी झाली.

यावेळी जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे, उपजिल्हाप्रमुख पंडीतराव भुतेकर, रावसाहेब राऊत, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सविता किंवडे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना भास्कर अंबेकर म्हणाले की, जिल्हा शिवसेनेने ढोल बजाओ, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शिवसेना सदस्य नोंदणी, अधिकाऱ्यांना घेरावे, गारपीटग्रस्तांना मदत, विज मंडळावरील मोर्चे, तहसिल कार्यालयांवरील आंदोलन, उपनिबंधकांना घेराव, भरडधान्य खरेदी केंद्र सुरु करणे, यासह सामाजिक उपक्रम, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, कामगारांचा विमा, शहीद जवानांच्या पत्नींचा गौरव, महिलांचा गौरव, मेळावे त्याचबरोबर बुथप्रमुखांच्या नेमणुका, शिवसेनेच्या शाखांचे नुतनीकरण व नवीन शाखांची स्थापना, असे सातत्याने राबविलेल्या उपक्रमांचा आढावा सादर करुन संघटनात्मक माहितीही सविस्तरपणे मांडली.

जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही जनतेच्या व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसह इतर कोणत्याही राजकीय पक्षांपेक्षा अधिक आंदोलने केली असल्याचे अंबेकर म्हणाले. तसेच मागील पाच वर्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सात ते पाच सभांचे आयोजन करण्यात आले. तसेच पर्यावरणमंत्री रामदास कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर अशा विविध नेत्यांचे मंत्र्यांचे दौरे जिल्ह्यात शिवसेनेत आम्ही कधीही मतभेद वादविवाद होऊ दिले नाहीत. जिल्ह्यात दोन पंचायत समित्या, जिल्हा परिषद, बाजार समित्या, ग्रामपंचायती आदी संस्थेवर शिवसेनेने विजयी मिळविलेला आहे, आदी माहिती जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी सादर केली.

यावेळी बोलतांना परतुर विधानसभेचे संपर्कप्रमुख देवा कदम हे म्हणाले की, शिवसेनेने कधीही जातीयवादाला थारा दिलेला नाही. सर्व जातीधर्माचे लोक
पुर्वीच्या व आताच्याही सरकारमध्ये मंत्री तसेच मोठ-मोठ्या पदांवर काम करीत आहेत. दलित, मुस्लीम यांचाही सहभाग पक्षात असू द्या, असेही ते
म्हणाले. याच कार्यक्रमात बोलतांना जालना विधानसभेचे संपर्कप्रमुख सुरेश काळे म्हणाले की, सर्व शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी पक्षात एकदिलाने काम करावे, पक्षांनी दिलेले विविध कार्यक्रम यशस्वी राबवावेत, जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वात समाधानकारकपणे काम सुरु आहे. एकदिलाने केल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर सुशिक्षित व अनुभवी जिल्हाप्रमुख असून सर्वांना सोबत घेऊन चालतात. पक्ष जिल्हाप्रमुखांना आदेश देतो, त्या आदेशाचे तंतोत पालन करा, असे आवाहनही संपर्कप्रमुख सुरेश काळे यांनी केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शहरप्रमुख विष्णु पाचफुले यांनी केले. यावेळी उपशहरप्रमुख घनश्याम खाकीवाले, संतोष सलामपुरे, दिनेश सुरसे, विलास
दहीहंडे, हरिष राजपुत, किशोर पांगारकर, नगरसेवक अशोक पवार, विजय पवार, गणेश घुगे, संतोष जांगडे, गोपी गोगडे, संदीप नाईकवाडे, माजी नगरसेवक विजय जाधव, गंगुताई वानखेडे, विभागप्रमुख परमेश्वर शिंदे, किशोर शिंदे, राजु सलामपुरे, भरत वुंâसुदल, अनिल अंभोरे, दिपक राठोड, मनोज लाखोले, जगदीश रत्नपारखे, रमेश टेकूर, दिनेश भगत, नरेश खुदभैय्ये, लखन कनिसे, इश्वर गायकवाड, अरुण गिरी, महिला आघाडीच्या राधाताई वाढेकर, दुर्गाताई देशमुख, संगिता नागरगोजे, मंगल मिटकर, मंजुषा घायाळ, लिलावती मोरे, रंजना सोनवणे, आशा कोळी, संगिता राऊत यांच्यासह अभिषेक काबलिये, प्रकाश घोडे, गोविंद चिलवर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या