शिवसेनेतर्फे जम्मूत दहा रुपयांत ‘साहेब खाना’ सुरू

2639

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या वचननाम्यात दहा रुपयांत जेवण देण्याचे वचन दिले. त्यातूनच आदर्श घेऊन जम्मू-कश्मीर शिवसेनेने गरजू लोकांना दहा रुपयांत ‘साहेब खाना’ सुरू केला आहे. या योजनेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.

उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून ही योजना सुरू करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे जम्मू-कश्मीर प्रदेशाध्यक्ष मनीष सहानी यांनी दिली. जम्मू येथील शिवसेना भवनात गरीबांना दहा रुपयांमध्ये हा ‘साहेब खाना’ उपलब्ध करून दिला जात आहे. दरदिवशी प्रत्येक व्यक्तीला ‘साहेब खाना’ थाळीमध्ये राजमा, भात, पुरी आणि चण्याची भाजी असे पदार्थ दिले जात आहेत. लवकरच ही सेवा जम्मूतील बक्षी नगर आणि शालिमार रुग्णाल येथे सुरू करण्यात येणार आहे. या योजनेच्या उद्घाटनप्रसंगी महिला आघाडीच्या मीनाक्षी छिब्बर, अश्विनी गुप्ता, विकास बक्षी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या