महापालिकेसमोरील लालपिवळा ध्वज हटवा! शिवसेनेचा बेळगावात महामोर्चा

बेळगाव महापालिकेसमोरील तिरंगा ध्वजाचा अवमान करणारा आणि मुठभर कन्नडिगांनी फडकविलेला बेकायदेशीर लालपिवळा ध्वज त्वरित हटवावा, या मागणीसाठी आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या नेतृत्वाखाली बेळगाव महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात लवकरच अंतिम निर्णय घेऊ, असे ठोस आश्वासन जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी दिले.

बेळगाव प्रशासनाकडून गेल्या दोन महिन्यापासून हा बेकायदेशीर ध्वज हटविण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या आवाहनानुसार आज सकाळी छत्रपती संभाजी महाराज चौक येथून या मोर्चास सुरुवात झाली. मराठी भाषिकांचा हा मोर्चा दडपण्यासाठी कानडी पोलीस प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले. बेळगावबाहेरून येणारे मराठी भाषक मोर्चाच्या ठिकाणी पोहोचू नयेत यासाठी ठिकठिकाणी रस्ते अडविण्यात आले होते. पोलिसांचा विरोध झुगारून मराठी भाषिकांचे जथ्थेच्या जथ्थे मोर्चामध्ये येऊन सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या