माता-पित्यांचे छत्र हरपलेल्या रेणुका गुंडरे हिला एकनाथ शिंदेंनी घेतले दत्तक

लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील होकर्णा गावातील रहिवासी रेणुका गुंडरे ही इयत्ता दहावीत 93.20 टक्के मिळवून उत्तीर्ण झाली. पण या यशात एक दुःखाची झालर असल्याचे शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित माहिती घेतली तेव्हा कळाले की रेणुका हिच्यावरिल माता-पित्यांचे कृपाछत्र हरविल्याने लहान वयातच कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी पेलणे रेणुका करिता खरोखर एक शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे, असे एकनाथ शिंदे यांना जाणवले.

रेणुका सारख्या हुशार विद्यार्थिनीला शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये आणि दोन धाकट्या भावंडाचे जबाबदारी पेलता यावी यासाठी रेणुका आणि भावंडाचे पालकतत्व स्वीकारण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. यासाठी ठाण्याचे माजी महापौर संजय भाऊराव मोरे यांनी लातूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख या नात्याने आज रेणुका गुंडरे हिच्या निवासस्थानी उपस्थित राहून राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या वतीने प्राथमिकस्वरुपी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली.

img-20201108-wa0017

यावेळी सोबत उदगीर-जळकोट विधानसभा संपर्कप्रमुख ऍड. श्रीनिवास क्षिरसागर, जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, सिनेट सदस्य व युवासेना जिल्हा विस्तारक प्रा. सूरज डांबरे, उपजिल्हाप्रमुख रामचंद्र आढवळे, बालाजी रेड्डी, गोपाळ माने, नगरसेवक चाकूर न.पं. व युवासेना जिल्हा विस्तारक कुलदीप, उदगीर तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, जळकोट तालुकाप्रमुख संग्राम टाले, माजी सभापती ब्राह्मजी केंद्रे, युवासेना उपजिल्हा विस्तारक रमण माने,अमर बुरबुरे तसेच शिवसेना वैद्यकिय मदत कक्षप्रमुख मंगेश चिवटे, वैद्यकीय सहाय्यक प्रसाद सूर्यराव आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या