ज्यांनी आपल्यावर विश्वास टाकलाय त्यांच्या विकासासाठी कटीबद्ध रहा!

138

सामना प्रतिनिधी । गारगोटी

राजकारणामध्ये जय-पराजय होतच असतो परंतु ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे त्यांच्या विकासासाठी, गावाच्या विकासाठी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी कटीबद्ध रहावे, असे आवाहन शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. जोतिर्लिंग शहर विकास आघाडीच्या नुतन ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच सरीता चिले उपस्थित होत्या.

गारगोटी ग्रामपंचायत निवडणुकीत मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, बजरंग आण्णा देसाई, प्रा. बाळ देसाई आदींनी एकत्र येऊन आघाडी केल्याने त्यांना विजय मिळाला असला तरी या निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्ते ठाम राहिल्याने किरकोळ मतांसाठी काही जागा गमवाव्या लागल्या आहेत. भविष्यात गारगोटी गावासाठी सर्वांना झटावे लागेल. तांत्रिकदृष्ट्या जरी आपला पराभव असला तरी विकास कामांच्या जोरावर सर्व कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे लढत दिली. त्या सर्वांचे अभिनंदन करून पुढील नगरपंचायत निवडणूकीमध्ये १८ – ० अशा प्रकारे निकाल लावण्यासाठी आत्तापासून कामाला लागावे, असे आवाहन आमदार आबिटकर यांनी केले.

यावेळी बोलताना मिलिंद पांगीरेकर म्हणाले, तांत्रीक दृष्ट्या जरी आपला पराभव झाला असला तरी मतांची बेरीज पहाता गारगोटी शहरामध्ये आपल्या पार्टीचा विजय झालेला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नगरपंचायत १८-० करण्यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन केले.

यावेळी सदाशिव खेगडे, भिमराव शिंदे, प्राचार्य अर्जुन आबिटकर, राजू चिले, दिलीप देसाई, सर्जेराव मोरे, रणधीर मोरे आदीनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच सरीता चिले, छाया सारंग, गिता मोरे, रुपाली राऊत, उपसरपंच अरुण शिंदे यांच्यासह मागी ग्रामपंचायात बॉडीचा उत्कृष्ठ काम केल्याबद्दल व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य स्मिता अजित चौगले, अनिता प्रदिप गायकवाड, सर्जेराव मोरे, रणधिर शिंदे, सुशांत सुर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बाजीराव चव्हाण, डी. व्ही. देसाई, सुर्यकांत चव्हाण, आर. के. देसाई, दिपक मोरे, विजय सारंग, महेश सुतार, अजित चौगले, तुकाराम गुरव, दशरथ राऊत, सतिश कांबळे, रणजित देसाई, दशरथ कुपटे, जितेंद्र भोसले, उदय सावंत, संग्राम सावंत, पांडूरंग कांबळे, रोहित देसाई, चिदंबर कलकुटकी, बी.के.कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन नंदकुमार निर्मळे, तर आभार अल्ताफ बागवान यांनी मानले.

आपली प्रतिक्रिया द्या